Last Updated on 08 May 2023 4:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जयपूर | राजस्थानमधल्या हनुमानगढ जिल्ह्यात भारतीय वायू दलाचं मिग २१ विमान कोसळून ३ महिलांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळं हे विमान बहलोलनगर गावातल्या एका घरावर पडल्यानं या नागरिकांचा मृत्यू झाला.
मिग 21 ट्रेनिंगसाठी निघालं होतं.सकाळी नियमित प्रशिक्षणासाठी सूरतगढमधून विमानाने उड्डाण केलं होतं.विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे.
दोन्ही पायटलनी प्रसंगावधान राखत विमानातून उडी मारल्यानं दोघेही बचावले.त्यांना किरकोळ इजा झाली आहे.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी वायू दलानं चौकशी समितीची स्थापना केली आहे.












































































