Last Updated on 25 Apr 2023 9:32 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बांधकाम विभागाकडून ॲपची निर्मिती;तक्रारीसाठी सरकारकडून Mobile app
मुंबई | राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तसेच उखडलेल्या भागाची नागरिकांना थेट मोबाईलव्दारे छायाचित्र काढून तक्रार करता येणार आहे.
त्यासाठी पीसीआरएस नावाचे ॲप सार्वजनिक बांधकाम खात्याने गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध करुन दिले आहे,अशी माहिती विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिली.राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 लाख 5 हजार किमीचे रस्ते बांधले असून 31 हजार शासकीय इमारती उभ्या केल्या आहेत.विभागाचे पूल, रस्ते आणि इमारती यांच्या संदर्भातली तसेच चालू प्रकल्पाची सर्व माहिती आता पीएमआयएस (प्रोजेक्ट, मॅनेजमेंट इन्फाॅर्मेशन सिस्टीम) पोर्टल व्दारे जनतेला खुली करण्यात आली आहे.सी-डॅकच्या मदतीने सदर प्रणाली तयार केली असून एक प्रकारे हा सार्वजनिक बांधकाम विभागाच डॅश बोर्ड आहे,असा दावा चव्हाण यांनी केला.
त्यासाठी पीसीआरएस नावाचे ॲप सार्वजनिक बांधकाम खात्याने गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन दिले आहे,अशी माहिती विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिली.
राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 लाख 5 हजार किमीचे रस्ते बांधले असून 33 हजार शासकीय इमारती उभ्या केल्या आहेत. विभागाचे पूल, रस्ते आणि इमारती यांच्या संदर्भातली तसेच चालू प्रकल्पाची सर्व माहिती आता पीएमआयएस (प्रोजेक्ट, मॅनेजमेंट इन्फाॅर्मेशन सिस्टीम) पोर्टल व्दारे जनतेला खुली करण्यात आली आहे. सी-डॅकच्या मदतीने सदर प्रणाली तयार केली असून एक प्रकारे हा सार्वजनिक बांधकाम विभागाच डॅश बोर्ड आहे.
पीसीआरएस हे मोबाईल ॲप सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध करुन दिले आहे.या ॲपच्या माध्यमातून नागरिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची तक्रार करु शकतील.तक्रार आल्यानंतर संबंधितांकडून त्याची दखल घेतली जाईल.या तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर तसा मेसेज तक्रारकर्त्यास जाणार आहे.सात दिवसांनी उपअभियंता स्तरावर या तक्रारींच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे.










































































