Last Updated on 15 Feb 2022 8:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
धनगर समाजातील बांधवांना घर बांधणे, युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षेसाठी शुल्कात आर्थिक सवलत लागू करणे, सैन्यात भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणे, स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देणे, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्माण करणे, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.
![]()
भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील लाभार्थ्यांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदीसाठी अनुदान स्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य देणे
शासन निर्णय क्र.पविआ 2019/प्र.क्र.216/पदुम-3.
(262 KB)
योजनेचे उद्देश :-
- धनगर व तत्सम समाजातील पशुपालकांना मेंढी किंवा शेळीपालन या व्यवसायापासून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे.
- माहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढपाळ कुटुंबाना मेंढयांच्या चराईच्या अनूषांगाने येणाऱ्या अडीअडचणी/समस्या यावर मात करणे.
- राज्यातील मेंढयांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यातील मेंढी/शेळीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे.
योजनेच्या अटी:-
- योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- भटक्या जमाती – क प्रवर्गातील लाभार्थ्याकडे स्वत:ची जमीन नसावी.
लाभाचे स्वरुप :-
भुमीहिन मेंढपाळ कुटुंबातील अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता किमान 1 गुंठा जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या 75 टक्के रक्कम अथवा किमान 30 वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाडयापोटी दयावयाच्या रकमेच्या 75 टक्के रक्कम एकवेळचे एकरकमी खरेदीसाठी अनुदान स्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणुन कमाल 50 हजार एवढे अनुदान वाटप करणे
संपर्क:-
संबंधित जिल्हयाचे पशुसंवर्धन उपायुक्त
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून देणे

शासन निर्णय क्रमांक: धइशाप्र: २०१९/प्र.क्र.७२/शिक्षण/दि. २९ जानेवारी, २०२०.
(3.3 MB)
धाराशाप्र.-२०१९/प्र.क्र.७२/शिक्षण दिनिक-५ सप्टेंबर, २०१९.
(742 KB)
योजनेचे उद्देश :-
- धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या बाबतीत मागे राहू नये.
- उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होत असल्यामुळे धनगर समाजाच्या विदयार्थ्यांना बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य व्हावे याकरिता शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे.
योजनेच्या अटी:-
- सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विदयार्थी धनगर समाजातील असावा.
- कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रू. 1.00 लाख इतकी असावी.
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले धनगर समाजाचे जातप्रमाणपत्र असावे.
लाभाचे स्वरुप :-
रेनकोट, भोजन, निवास खर्च, टयुशन फी, सुरक्षा अनामत, शिक्षण शुल्क, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य पुरवले जाईल.
संपर्क:-
संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त .
![]()
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या बेघर कुटुंबियांना घरकुले बांधून देणे

शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१८/धसयो/दि.५ फेब्रुवारी, २०२०.
(3.5 MB)
योजनेचे उद्देश :-
- अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा.
- भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या लोकांच्या जीवनात स्थिरता यावी.
योजनेच्या अटी:-
1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.
संपर्क:-
ही योजना ग्रामविकास विभागाच्या गृहनिर्माण कक्षामार्फत राबविण्यात येईल.
केंद्र शासनाच्या स्टॅन्ड अप योजनेत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या महिलांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे

शासन निर्णय क्र. सीबीसी-२०१९/प्र. क्र. १२७/मावक दि. ६ सप्टेंबर २०१९.
(364 KB)
योजनेचे उद्देश :-
- धनगर समाजातील सवलतीस पात्र असलेल्या नवउद्योजक महिला लाभार्थ्यांना १५ टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.
योजनेच्या अटी:-
1. योजनेचा लाभार्थी ही भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील महिला असावी.
2.सदर योजनेचा लाभ स्टॅड इंडिया योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल.
लाभाचे स्वरुप :-
धनगर समाजातील सवलतीस पात्र असलेल्या नवउद्योजक महिला यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बॅंकेने अर्जदारास स्टॅड इंडिया योजने अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के राज्यशासनामार्फत देण्यात येईल मार्जिन मनी उपलब्ध करून देणे
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराई करण्याकरिता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी अनुदान देणे

शासन निर्णय क्रमांक: पविआ-१०१९/प्र. क्र.२१६/पदुम-३.
(434 KB)
योजनेचे उद्देश:-
- राज्यातील भटकंती करणाऱ्या धनगर व तत्सम समाजातील पशुपालकांना पारंपारिक पद्धतीने करीत असलेल्या मेंढी/शेळीपालन या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणे.
- माहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढपाळ कुटुंबांना मेंढ्यांच्या चराईच्या अनुषंगाने येणाऱ्या अडीअडचणी/समस्या यावर मात करणे.
- राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यावर वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- राज्यातील मेंढी/शेळीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे
योजनेच्या अटी:-
1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.
संपर्क:-
ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येईल.
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धापूर्व परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देण्याबाबत योजना

शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र ०३/विजाभज-०१, दिनांक-०६ सप्टेंबर २०१९.
(3.1 MB)
योजनेचे उद्देश:-
1.लोकसेवांमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरीता भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी परीक्षापूर्व प्रशिक्षण देऊन त्यांचे प्रशासकीय सेवेतील प्रमाण वाढवणे.
2.स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतींना स्पर्धेस यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्यासाठी आवश्यक ते मुलभुत प्रशिक्षण उपलष्ध करुन देणे.
3.परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देणे.
योजनेच्या अटी:-
1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.
2.सदर उमेदवार हा 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.
लाभाचे स्वरुप :-
1.परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा .
2. स्पर्धा परिक्षा पूर्वतयारीसाठी आवश्यक ते मुलभुत निवासी प्रशिक्षण उपलष्ध
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील बेरोजगार यवक-युवतींस लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे

शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र. क्र. ०४/विजाभज-१/दि. २९ जानेवारी, २०२०.
(3.5 MB)
योजनेचे उद्देश:-
1. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी पूर्व शिक्षण देणे.
2.स्पर्धा परीक्षेत भाग घेणारे युवक व युवती हयांना स्पर्धत यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी व त्यासाठी आवश्यक ते मूलभूत शिक्षण पुरवणे.
योजनेच्या अटी:-
1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.
2. सदर विदयार्थी हा 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
लाभाचे स्वरुप :-
- लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी पूर्व शिक्षण.
- स्पर्धा परिक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी व त्यासाठी स्पर्धा परिक्षापुर्व निशुल्क प्रशिक्षण.
संपर्क :-
व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील लोकांना ग्रामीण परिसरातील कुकुटपालन संकल्पनेअंतर्गत धनगर समाजातील कुटुंबीयांना ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुकुटपक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी सहाय्य करणे

शासन निर्णय क्र. कुक्कुट-२०१९/प्र.क्र.९३/पदूम-४.
(3.1 MB)
योजनेचे उद्देश :-
1. पारंपारिक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला जोड देणे व लाभार्थ्याचे कौशल्य विकसित करणे.
2.कुक्कुटपक्षी व्यवस्थापनामध्ये सुधारणा करून संतुलित आहार पुरवणे तसेच कुकुटपालन व पशुसंवर्धनविषयक इतर योजना राबविणे.
3.स्वयंरोजगार उपलब्ध करून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास्तव ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालनास चालना देणे.
योजनेच्या अटी:-
- योजनेचा लाभार्थी हा भटक्या जमाती – क प्रवर्गातील जात प्रमाणपत्र धारण करणारा व 18-60 या वयोगटातील असावा.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा.
- परसातील कुक्कुटपालनासाठी लाभार्थ्याकडे स्वत:ची पुरेशी जागा असावी .
संपर्क :-
ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येते.
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर व अमरावती या महसुली विभागाच्या ठिकाणी वस्तीगृह निर्माण करणे

शासन निर्णय:धवयो-२०१९/प्र.क्र-०५/विजाभज-०१, दि. १२ जानेवारी, २०२१.
(3.5 MB)
शासन निर्णय क्र. धवयो-२०१९/प्र. क्र. ०५/विजभाज-०१/दिनांक ०६ सप्टेंबर, २०१९.
(3.4 MB)
योजनेचे उद्देश :-
1.गेली अनेक वर्ष विकासापासून दूर असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मुलांना चांगले शिक्षण घेता यावे याकरिता जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वस्तीगृहाची सोय उपलब्ध करून देणे.
2.वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर व उच्च शिक्षणाकरिता सहाय्य करणे.
3.वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक गुणांचा विकास होण्यासाठी व कौशल्य विकासाकरिता मुलामुलींना विविध सुविधा पुरविणे.
योजनेच्या अटी:-
- विदयार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विदयार्थी धनगर समाजातील असावा.
- कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रू. 1.00 लाख इतकी असावी.
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले धनगर समाजाचे जातप्रमाणपत्र असावे.
लाभाचे स्वरुप :-
वस्तीगृहामध्ये मोफत निवास,भोजन ,शैक्षणिक साहित्य ,आरोग्य इत्यादी सोयीसुविधायुक्त निवासाची व्यवस्था करण्यात येईल.
संपर्क:-
- संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाजकल्याण
- संबंधित वस्तीगृहाचे गृहपाल .
भटक्या जमाती-क मधील धनगर समाजातील बेरोजगार युवक -युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करण्याबाबत

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.६/विजाभज-१/दि. २८ जानेवारी, २०२०.
(3.31 MB)
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१९/प्र. क्र. ०६/विजाभाज-१.
(3.2 MB)
योजनेचे उद्देश:-
1. भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील आर्थिकदृष्टया कमकुवत गटातील बेरोजगार युवा-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती देणे.
योजनेच्या अटी:-
1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.
2. सदर विदयार्थी हा 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.
लाभाचे स्वरुप :-
- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेत बसण्यासाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती.
संपर्क :-
व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती
वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरु करण्याबाबत

शासन निर्णय क्रमांक. धवगृ-२०१९/प्र.क्र.१२६/मावक/दि.६ सप्टेंबर, २०१९.
(405 KB)
योजनेचे उद्दिष्ट
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विदयार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहु नये याकरिता उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे.
योजनेच्या अटी:-
- विदयार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विदयार्थी धनगर समाजातील असावा.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न कमाल रू. 2.50.00 लाख पेक्षा जास्त नसावे.
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले धनगर समाजाचे जातप्रमाणपत्र असावे.
- विदयार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक आपले राष्टीयकृत बॅंक खात्याशी संलग्न करणे आवश्यक .
लाभाचे स्वरुप :-
वस्तीगृहामध्ये मोफत निवास,भोजन ,शैक्षणिक साहित्य ,आरोग्य इत्यादी सोयीसुविधायुक्त निवासाची व्यवस्था करण्यात येईल.
संपर्क :-
संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाजकल्याण
![]()








































































