Last Updated on 25 Sep 2023 9:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । नांदगाव (ता.कराड) येथे गणेशोत्सवानिमित्त मोदक महोत्सवात मोदक बनवा स्पर्धा उत्साहात झाल्या. यात 100 वर माता-भगिनींनी सहभाग नोंदवला. त्यात नांदगावच्या पुनम नरेंद्र पाटील यांचा पानमसाला मोदक भारी ठरला. तर ओंडच्या स्वाती जीवन थोरात यांच्या गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक मोदकाला दुसरा क्रमांक मिळाला.
मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे स्मृती मंच यांच्या वतीने नांदगाव व पंचक्रोशीतील महिलांसाठी ‘मोदक बनवा स्पर्धा’ आयोजित केली होती. त्यात 100 वर स्पर्धकांनी भाग घेतला. ग्रामीण भागातील या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला .महिलांच्या एक से बढकर एकच पाककला यावेळी पाहायला मिळाल्या. त्याचे परीक्षण प्रा. डॉ.नरेंद्रकुमार सूर्यवंशी व सोनिका कोरडे यांनी केले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना बाबा फार्मिंग ज्वेलरी चे 1 ग्राम ज्वेलरीतील ‘बानू नथ’ भेट देण्यात आली. तर पहिल्या पाच क्रमांक प्राप्त महिलांना अनुक्रमे 1 ग्रँम चे गंठण ,लॉंग हार, नेकलेस, बांगड्या अशी बक्षीसे देण्यात आली.
विजेत्यांना दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वि.तु. सुकरे -गुरुजी ,सचिव एस.टी सुकरे (सर), उद्योजक विजय कदम, शितल कदम, प्राचार्य आर.बी. पाटील, उज्वला गरुड, दिलीप महाजन आदींच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.त्यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.









































































