Last Updated on 01 Jun 2023 10:05 AM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
मुंबई । मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गिरणगाव भागातील,परळस्थितआणि मुंबई विद्यापीठ संलग्न असलेल्या महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी कला आणि वाणिज्य वरिष्ठ रात्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी बी.ए.आणि बी. कॉम. भाग -1,2, 3 या वर्गाचे प्रवेश सुरु झाले असून विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिलीपकुमार कांबळे यांनी केले आहे.
प्रशस्त इमारत,माफक फी,शिष्यवृत्ती, फ्री शीप सुविधा उपलब्ध.तसेच क्वालिफाईड आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे प्रयत्न केले जातात.सकाळी नोकरी करून रात्री विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे या एकमेव उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष आणि सी.ई.ओ. डॉ. सतीश केळशीकर यांनी सन 2001साली हे रात्र महाविद्यालय सुरु केले.
महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीला मोठी परंपरा असून संस्थेच्या इमारतीचे उदघाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभ हस्ते झाले होते.रात्र महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात उच्च पदस्थ म्हणून कार्यरत आहेत तसेच व्यवसायिक म्हणूनही स्थिरावले आहेत.
![]()
हेही वाचा…
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी वेबपोर्टल; प्रवेशप्रक्रिया 1 जूनपासून सुरु होणार
![]()












































































