Last Updated on 12 Nov 2023 8:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली वैभव संस्थेचे संस्थापक पी. आर. पाटील
सांगली | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी,पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सांगली वैभव क्रेडिट सोसायटी मुंबई व आम्ही सांगलीकर मुंबई या संस्थेच्यावतीने सहकार दिन,सोमवार,दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी १०.३० वाजता विधान भवन मुंबई जवळील स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी ११ ते २ यावेळेत आझाद मैदान, सीएसटी येथील पत्रकार संघाच्या सभागृहात,सहकार दीन हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे व उल्हासदादा पवार मार्गदर्शन करणार आहेत,अशी माहिती सांगली वैभव संस्थेचे संस्थापक पी. आर. पाटील यांनी दिली आहे,या कार्यक्रमाचे आयोजन सांगली वैभव क्रेडिट सोसायटी, वसंतराज क्रेडिट सोसायटी, व आम्ही सांगलीकर या संस्थेने केले आहे,तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.












































































