Last Updated on 09 May 2024 10:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, 06.05.2024 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून कोटे डी’आयव्होर या देशाच्या एका नागरिकाला अटक केली.
प्रदीर्घ चौकशी नंतर या प्रवाशाने भारतात तस्करी करण्यासाठी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याची आणि त्या शरीरातून आणल्याची कबुली दिली. या प्रवाशाला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईतील सर जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.रूग्णालयात 06.05.24 ते 08.05.2024 या कालावधीत या प्रवाशाच्या पोटातून 1468 ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण 77 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या.
या कोकेन साठ्याची अवैध बाजारातील किंमत सुमारे 15 कोटी रुपये इतकी आहे.या प्रवाशाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.











































































