Last Updated on 24 Aug 2024 3:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रायगड । ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाची तीव्रता व कमाल तापमानामद्धे वाढ होण्याची दाट शक्यता आहे. असे वाताबरण हे भातपिकाच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असे आहे परंतु अशा वातावरणामध्ये भातपिकावरील किडींचा प्रादुर्भाव देखील दिसून येऊ शकतो. येत्या काही दिवसामध्ये श्रावण महिना सुरू होत असल्याने पावसाची उघडीप व कमाल तापमानमध्ये वाढ दिसून येऊ शकते. यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या भातशेतीकडे सुरुवातीपासूनच लक्ष देणे गरजेचे आहे. सदर प्रकल्पाचे हवामान हे भातावरील पिवळा खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी या किडींसाठी अनुकूल असून त्यामुळे सदर किडींचा प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता संभवते. त्यामुळे सद्यपरीस्थितीत येणाऱ्या किडींचे नियंत्रण खालीलप्रमाणे करावे.
भातावरील पिवळा खोडकिडा, नुकसानीचा प्रकार :- या किडीचा प्रादूर्भाव रोपवाटीकेत तसेच लावणीनंतर पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये आढळुन येतो. अळी सुरूवातीस काही वेळ कोवळ्या पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादूर्भाव फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पिक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच “गामा मर” असे म्हणतात. पोटरी अवस्थेत देखील कीडीचा उपद्रव आढळल्यास दाणे न भरलेल्या पांढ-या लोच्या बाहेर पडतात. यालाच “पळींज किंवा पांढरी पीशी” असे म्हणतात.
एकात्मिक व्यवस्थापन तांत्रिक पध्दतीचा अवलंबः- मादी पतंग प्रकाशर्पिजन्यात आकर्षित करुन नष्ट करावेत, किडीचे अंडीपुंज वेळोवेळी गोळा करून नष्ट करावेत, किडग्रस्त फुटवे आणि पळींज उपटून नष्ट करावेत, भात शेतामध्ये 20 ते 25 मी अंतरावर हेक्टरी 20 गंध सापळ्यांचा वापर करावा.
जैविक नियंत्रण- भात खाचरात बेडकांचे संवर्धन करावे, लावणीनंतर 30 दिवसांपासून ट्रायकोग्रामा जापोनिकम ची हेक्टरी 50,000 अंडी 3 ते 4 वेळा 10 दिवसांच्या अंतराने शेतात सोडावी.
रासायनिक किटकनाशकांचा वापर-दाणेदार कीटकनाशक उदा. कारटॅप हायड्रोक्लोराईड 4 टक्के दाणेदार 18.75 किलो किया क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल 4 टक्के दाणेदार 10 किलो किंवा फिप्रोनिल 0.34 टक्के दाणेदार 20.8 किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात वापरावी. पुरेशा ओलाच्या अभावी किंवा उताराच्या जमिनीत दाणेदार कीटकनाशक वापरणे शक्य नसल्यास प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी ॲसीफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी 625 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 1250 मि.लि. किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के प्रवाही 600 ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाइड 20% WG 125 ग्रॅम किंवा डेल्टामिग्रीन 1.8 टक्के प्रवाही 650 मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथीन 5 टक्के प्रवाही 500 मिली/हेक्टर या प्रमाणात फवारावे.
पाने गुंडाळणारी अळी नुकसानीचा प्रकार :- या किडीची अळी पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिकटवून गुंडाळी करते. अळी आतील पृष्ठभागातील हरितद्रव्य खाते. त्यामुळे गुंडाळीच्या बाह्य पृष्ठभागावर पांढरा पट्टा पडतो. नुकसान जास्त असेल तर पीक निस्तेज पडते.
एकात्मिक व्यवस्थापनः बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत, ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकांची 50,000 अंडी प्रति हेक्टरी पिकामध्ये सोडावीत, पीक फुटव्याच्या मध्यावस्थेत किंवा पोटरीत असते त्यावेळी प्रत्येक चुडात 2 नवीन कीडग्रस्त पाने दिसल्यास प्रति हेक्टरी कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के 1000 ग्रॅ. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 750 मि.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 2.0 लिटर किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही/500 लीटर पाण्यात किंवा अॅसीफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी 625 ग्रॅम/लिटर किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 % प्रवाही 500 मिली किंवा फ्युबेन्डामाइड 20% WG 125 ग्रॅम प्रवाही प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. दाणेदार कीटकनाशक कारटॅप हायड्रोक्लोराईड 4G 18.75 किलो किंवा क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल 0.4 G प्रति 10 किलो किंवा फिप्रोनिल 0.3 G प्रति 20.8 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावी.
सुरळीतील अळी नुकसानीचा प्रकार :-अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करून त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी सुरळीसह भाताच्या आव्यावर चढते व पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. पिक निस्तेज दिसते. वाढ खुंटते.सुरळ्या पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगताना दिसतात,
एकात्मिक व्यवस्थापन :- शेतात पाणी बांधून ठेवावे व नंतर कीडग्रस्त पिकावरत्ती एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. नंतर शेतातील पाणी बाहेर काढावे म्हणजे पाण्याबरोबर खाली पडलेल्या सुरळया वाहून जातात त्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेतातील पाणी शक्य असल्यास काढून टाकावे व नंतर 50 टक्के अॅसीफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी 2 ग्रॅम/लीटर किया डेल्टामिधीन 1.8 टक्के प्रवाही 650 मिली किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के प्रवाही 600 ग्रॅम किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 500 मिली/500 लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात फवारावे.
निळे भुंगेरे नुकसान : निळे भुंगेऱ्याची प्रौढ व अळी या दोन्ही अवस्था हानीकारक आहेत. प्रौढ व अळया पानाचा हिरवा भाग/हरित द्रव्य खातात व पापुद्रा तसाब ठेवतात, त्यामुळे पानांवर समांतर पांढऱ्या रेषा उमटतात. अशा अनेक रेषा एकमेकांत मिसळतात व त्याठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. असे चटटे तपकिरी होतात व कालांतराने पाने करपल्यासारखी दिसतात. ही कीड पानाच्या गुंडाळीत आढळुन येते. प्रादूर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यास रोपे सुकतात व त्यातुन लोंब्या बाहेर पडत नाहीत.
एकात्मिक व्यवस्थापन :- नत्र खतांची मात्रा शिफारशी प्रमाणे द्यावी. अतिरिक्त मात्रा देऊ नये. शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत. ही कीड छोटा चिमणचारा, हरकी, गजराज, पॅरागवत, हिरवा चारा, मारवेल या गवतांवर आढळून येते. म्हणून बांधावरील गवत काढून नष्ट करावे. या किडीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे भात पिकावरील खोड कीड व पाने गुंडाळणारी अळी या किडीसाठी प्रमाणित केलेली (लेवल क्लेम) किटकनाशके वापरावीत. 50 टक्के प्रवाही कारटॅप हायड्रोक्लोराइड 12 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यात किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 27 मि.ली. प्रति 10 लीटर पाण्यात किंवा अॅसीफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी 20 ग्रॅम प्रति 10 लीटर किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5 टक्के 5 मि.ली. प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (नोट सदर कीटक नाशक हे लेबल क्लेम नाहीत.)
भातपिकावरील रोग बुरशीजन्य करपा (मॅग्नापोर्थीप्रीसी) लक्षणे:- पीक वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये या रोगाचा प्रादूर्भाव होवू शकतो. या रोगाणी लक्षणे पाने, पानांचे आवारण, रोपांचे पेर, लोंबीचा देठ, दाण्याची टरफले, या भागांवर दिसून येतात. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत पानांवर निळसर जांभळ्या रंगाचे अन्य छोटे ठिपके दिसून येतात. कालांतराने या ठिपक्यांचा आकार वाढून ते शखाकृती अथवा डोळ्यांच्या आकाराचे होतात. नंतर या ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा तर कडा तपकिरी रंगाच्या तात काही काळानंतर पानांवरील अनेक ठिपके एकमेकांत मिसळून संपूर्ण पाने करपून जातात. काही वेळा पानांप्रमाणे पानांच्या आवरणावर देखील शंखाकृती ठिपके दिसून येतात. तीव्र प्रादूर्भाव झाल्यावर सर्व रोपाची पाने करपतात यालाच रोप गळणे अथवा नर्सरी वर्ष असे म्हणतात. प्रादूर्भाव पेरांवर झाल्यास रोगरत भाग काळा पढ्न कुजतो आणि पेर मोडते.
लोंबी भरण्याच्या अवस्थेत प्रादूर्भाव झाल्यास लोंबीचा देठ काळा पडून सुजतो आणि लोंबीचा भार सहन न झाल्याने कुजलेल्या भागात लोंबी मोडते. लोंबीतील दाण्यांच्या टरफलकार तपकीरी रंगाचे ठिपके दिसतात. यामुळे दाण्याचे नुकसान होते. रोगाची मानमोडीची अवस्था अधिक नुकसानकारक आहे.
रोगवाढीस अनुकूल हवामान-अधूनमधून पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, 90 टक्केपेक्षा जास्त सापेक्ष आद्रता, रात्रीचे तापमान 19 ते 21 से. असे वातावरण रोगाचा प्रादूर्भाव होण्यास अनुकूल असते आणि याना प्रसार वाऱ्यामार्फत तसेच पावसाच्या थेंबामुळे होतो.
व्यवस्थापन- नत्र खताचा अतीरिक्त वापर टाळावा आणि नत्रासोबतच स्फुरद व पालाश यांचा शिफारशीनुसार वापर करावा. शेतात रोग दिसून येताच ट्रायसायक्लॉझॉल (75 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) 10 लि.पाण्यात 10 ग्रॅ. (0.1 टक्के) अथवा आयसोप्रोथिऑलेन (40 टक्के प्रवाही) 10 ली पाण्यात 10 मिली (0.1 टक्के) यापैकी एका बुरशीनाशकाच्या फवारणीची शिफारस करण्यात येते. पुढील दोन फवारण्या 21 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
पर्णकोश करपा लक्षणे :- रोपाला फुटवे येण्याच्या अवस्थेत चुडाच्या तळाशी रोगाची प्राथमिक लागण होऊन क्रमाक्रमाने वरच्या भागात पसरत जाते. त्यावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके तयार होतात, खोडाचा चिवटपणा कमी झाल्याने खोड कोलमडते आणि पीक करपल्यासारखे दिसते. रोगग्रस्त झाडावर लोबी धरत नाही. कालांतराने रोगग्रस्त भागावर बुरशीची मातकट काळया रंगाची ठळक बुरशी बीजे दिसून येतात.
व्यवस्थापन- पीक फुटवे येणाऱ्या अवस्थेत असताना प्रोपेकोन्झोल कींवा हेक्झाकोनॅझोल 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यातून फुटव्यांवर फवारावे. रोग तीव्रतेप्रमाणे अथवा आवश्यकतेप्रमाणे दुसरी व तिसरी फवारणी करावी.










































































