Last Updated on 03 May 2023 11:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | पुढील वर्षी होऊ घातलेली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने आपल्या प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार केला आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत नवी कार्यकारिणी जाहीर केली. नव्या जम्बो कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.
भाजपच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, अॅड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी आमदार रणधीर सावरकर, अॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करताना पक्षाने विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांना सरचिटणीस पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे.














































































