Last Updated on 23 Nov 2025 10:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे आणि हुबालवाडी गावाच्या शिवेवर असलेल्या डांगबाबा शिंदे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना, आज दुपारी
मजुरांना ऊसाच्या फडात तीन लहान आणि गोंडस पिल्ले आढळली. ही पिल्ले नेमकी कोणाची आहेत, या एकाच प्रश्नाने संपूर्ण परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती.
परिसरात गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. दोन शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न आणि पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे शेतकरी आधीच धास्तावलेले आहेत. त्यामुळे, ऊसात सापडलेली ही पिल्ले बिबट्याचीच असावीत का? या प्रश्नाने शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. यामुळे तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्यात आला.
वन विभागाच्या तपासणीत उलगडले सत्य!
शेतकऱ्यांनी पिल्लांचे फोटो आणि व्हिडिओ वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठवले. अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर, अखेर या पिल्लांमागील सत्य उघड झाले! ही पिल्ले बिबट्याची नसून, ती रान मांजराची (Jungle Cat) असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.
पिल्ले सुरक्षित ठिकाणी…
रान मांजराची पिल्ले असल्याची खात्री पटताच, त्यांना कोणतीही इजा न करता, ती ज्या ठिकाणी आढळली, त्याच ठिकाणी सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची भीती दूर झाली असली, तरीही पिल्ले नेमकी कशाची आहेत, या रहस्याने काही काळ लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 20 Apr 2026 11:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit २० ते २४ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा मुंबई । भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी... Read more














































































