Last Updated on 28 Jul 2023 9:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे,हुबालवाडी,खरातवाडी कार्यक्षेत्र असलेल्या बहे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत भीमराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी रामचंद्र आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस पाटील (मोकाशी) यांनी निवड प्रक्रिया पार पाडली.सचिव राजेंद्र इरकर,संदीप पाटील,सुधाकर मोहिते यांचे त्यांना सहकार्य लाभले.राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,सिताराम हुबाले यांनी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माजी अध्यक्ष जयदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व विकास नांगरे यांनी आभार मानले.यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक अविनाश खरात,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील,राजारामबापू बँकेचे माजी संचालक बाबूराव हुबाले,एच.आर.पाटील विलासराव पाटील,उपसरपंच हणमंतराव पाटील,वसंतराव पाटील,सर्जेराव पाटील,भानुदास खरात,शहाजी पाटील,सयाजी पाटील,सोसायटीचे माजी उपाध्यक्ष भीमराव कुंभार,संचालक कुंडलिक खरात,डांगबाबा शिंदे,रणजित पवार,अधिक दमामे,लालासाहेब मोहिते,गणपती शिंदे तसेच सभासद,कर्मचारी आदी उपस्थित होते.









































































