Last Updated on 30 Jan 2022 12:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
असा आहे अनोखा प्रयोग
घरातील प्लास्टिक कच-यात प्लास्टिक टाकू नका
प्लास्टिक आणून देणा-यांना प्रतिकिलोनुसार परतावा मिळणार
कच-यातील प्लास्टिक टप्याटप्याने कमी करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे
प्लास्टिक फेकून न देता एकत्रित संकलित करुन ते ग्रामपंचायतीकडे द्यावे
सांगली ।
राज्यात प्लास्टिक बंदी असली तरीही प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे दिसते.प्लॅस्टिकचा वापर कमी व्हावा या उद्देशाने बहे (ता.वाळवा) ग्रामपंचायतीने प्लास्टिक कचरा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.बहे प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बहे ग्रामपंचायतीला आतापर्यंत राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.आता हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.गावात प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी ग्रामस्थांकडून प्लास्टिक कचरा विकत घेतला जाणार आहे.स्वच्छ प्लास्टिक १० रुपये प्रति किलो दराने महिन्याच्या १५ व ३० तारखेला ग्रामपंचायत मार्फत खरेदी केले जाणार आहे.
प्लास्टिक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याचा फटका पर्यावरणाला बसत आहे.ओढे,नाल्यात प्लास्टिकचा कचरा तयार होऊन जलचरांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी घरामध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकावा घंटागाडीत कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक टाकू नये.ग्रामस्थांनी घरातील स्वच्छ प्लास्टिक संकलन करावे आणि संकलित केलेले प्लास्टिक ग्रामपंचायतीत जमा करून उत्पन्न मिळवावे.प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.त्याचे वजनाप्रमाणे पैसे दिले दिले जातील असे सरपंच सौ. छायाताई पाटील व उपसरपंच सौ. अर्चना दमामे, ग्रामसेवक सागर मोकाशी यांनी सांगितले.









































































