Last Updated on 17 Mar 2022 9:25 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई पोलिसांचे ‘श्रीवल्ली’ गाणे होतेय सर्वत्र व्हायरल
मुंबई ।
अल्लू अर्जूनने साकारलेल्या पुष्पाचं अवघ्या देशालाच ‘येड लागले’.मात्र या चित्रपटातील गाणे आणि संवादाची क्रेझ अद्याप कायम आहे.लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या चित्रपटाने भूरळ घातली आहे.मुंबई पोलीसदेखील यातून सुटलेले नाहीत.तेही पुष्पामधील श्रीवल्ली गाण्याचे चाहते झाले आहेत.मुंबई पोलिसांचा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.यात पोलिसांच्या बँड पथकाने पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर जबरदास्त परफॉर्मेन्स दिला आहे.
पुष्पा चित्रपट आणि त्या चित्रपटातील विशेष गाण्यांनी सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवलेले आपण बघितले आहे.मराठीपासून अनेक व्हर्जन या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर झाले.
मुंबई पोलिसांच्या बँड पथकाची संपूर्ण देशभरात चर्चा होते.त्यातच हे बँड पथक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाणं. या गाण्यावर मुंबई पोलिसांच्या बॅंड पथकाने अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे.या सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहून मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.
मुंबई पोलिस बॅन्ड पथकाने श्रीवल्ली हे गाणं बॅन्डवर वाजवले.’मुंबई पोलिसांची सुरेल सफर कभी ‘रुकेगा नहीं’’असं कॅप्शन दिले आहे.ड्रम, सॅक्सोफोन,ट्रम्पेट,बासरी अशा अनेक वाद्यांच्या समावेश श्रीवल्ली गाण्याचे बॅन्ड व्हर्जन तयार करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.श्रीवल्ली असे कॅप्शन खाकी स्टुडिओने दिले होते.याआधीही खाकी स्टुडिओने लता मंगेशकर यांच्या ‘ए मेरे वतन के लोगों’ आणि ‘मनी हाईस्ट’ या गाण्याचे ‘बेला चाओ’ गाणे सादर करून लोकांची मने जिंकली होती.












































































