Last Updated on 25 Jul 2023 7:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे | सांगली जिल्हा भाजपाचे नुतन अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचा सत्कार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पुणे येथे आज (मंगळवारी) पश्चिम महाराष्ट्र लोकसभा मतदार संघातील आढावा बैठक भाजपा प्रदेशच्या वतीने आयोजीत करण्यात आली होती.यावेळी सांगली जिल्हा भाजपा अध्यक्षपदी निशिकांत भोसले- पाटील यांची निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील,माजी खासदार अमर साबळे,पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी मुरलीधर मोहोळ,भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.












































































