Last Updated on 29 Jul 2024 9:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कृष्णेच्या पाणी पातळीत घट; नदीकाठच्या लोकांना दिलासा, धास्ती मात्र कायम
सातारा । गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोयना परिसर तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवारपासून कमी झाला आहे.पावसाचा जोर मंदावल्याने कोयना धरणातील पाण्याची अवाक कमी झाली आहे.धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 38 हजार 014 क्युसेस अशी सुरू आहे.सोमवारी (29 जुलै) सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 85.06 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 80.62 टक्के भरले आहे.
पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या आठ-दहा दिवसात मुसळधार झाल्याने येव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून 30 हजार क्युसेक्स व पायथा विद्युत गृहातून 2 हजार 100 क्यूसेक्स एकूण 32 हजार 100 क्यूसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.
गेल्या गेल्या आठ-दहा दिवसात कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत होती.परंतु पावसाचा जोर शुक्रवारपासून कमी झाला आहे.त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत कराड कोयना पूल, बहे पूल परिसरात हळूहळू घट होऊ लागली आहे.त्यामुळे कृष्णाकाठच्या लोकांना सध्यातरी दिलासा मिळाला आहे.धास्ती मात्र कायम आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र आजही अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे, दरम्यान त्यातच आता राज्यातील विविध भागांमध्ये आज पुन्हा एकदा हवामान विभाग (IMD)कडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी (29 जुलै) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 71 मिलिमीटर, नवजा येथे 67 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 93 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 85.06 टीएमसी इतका झाला असून धरण 80.62 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 476 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 055 आणि महाबळेश्वरमध्ये 3 हजार 755 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.29/07/2024,वेळ:सकाळी 08:00 वाजता
पाणीपातळी:2146’07″(654.279मी)
पाणीसाठा:84.85 टीएमसी(80.62%)
आवक:- 38,014 क्यूसेक्स
कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 30000 क्यूसेक्स व पायथा ग्रहातून 2100 क्यूसेक्स असा 32,100 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 71/3476
नवजा 67/4055
महाबळेश्वर 93/3755
पूर नियंत्रण कक्ष, सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–29/07/2024 8:00 AM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/23’03”
2) बहे पूल-(23.7)10’3″
3) ताकारी पूल (46)/38’00
4)भिलवडी पूल -(53)38’10”
5)आयर्विन- (45)/39’00”
6)राजापूर बंधारा-(58)/53’0″
7) राजाराम बंधारा-(43)/46’04”
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 52498
2) आयर्विन पूल – 93254
3) राजापूर बंधारा – 243599
4) राजाराम बंधारा – 65401
5) कोयनाधरण- 84.86 TMC/32100
6)वारणा धरण- 29.29 TMC/ 16976
7)अलमट्टी धरण- 67.859
आवक – 271385
जावक-300000


Update : 29 july 2023, Time 08:05 AM







































































