Last Updated on 19 Mar 2022 8:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
25 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा भगवंत मान यांचा निर्णय
चंदीगड |
पंजाब सरकारने आज आपल्या पहिल्या बैठकीत राज्यातील विविध विभागांमधील 25 हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली आज चंदीगड येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत काही लोकहिताचे निर्णय घेण्यात आले.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भगवंत मान म्हणाले की,राज्याच्या पोलीस खात्यातील दहा हजार आणि इतर विविध विभागातील १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री म्हणाले की, आम आदमी पक्षाने निवडणूक प्रचारादरम्यान ही पदे भरण्याचे आश्वासन दिले होते.पदांची अधिसूचना आणि जाहिरातीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल,असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एका महिलेसह आम आदमी पक्षाच्या (आप) दहा आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.या 10 मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली.
हरपाल सिंग चीमा, हरभजन सिंग, डॉ. विजय सिंगला, लाल चंद, गुरमीत सिंग मीत हेअर, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्म शंकर झिम्पा, हरजोत सिंग बैंस आणि डॉ. बलजीत कौर यांना शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 18 पदे आहेत.
Chaired the first cabinet meeting. The Punjab cabinet has approved notification of 25,000 job vacancies within one month.
As we promised before the election, jobs opportunities for our Punjab's youth will be the topmost priority of AAP Govt.
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 19, 2022












































































