Last Updated on 21 Jul 2023 10:13 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । सांगली जिल्ह्याचे भाजपाचे नुतन अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी भाजपा च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेनंतर प्रथमच मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुरेश खाडे यांची मुंबईत भेट घेतली.यावेळी खा.संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुरेश खाडे यांनी निशिकांत भोसले- पाटील यांची सांगली जिल्हा भाजपाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस म्हणाले,निशिकांत भोसले- पाटील हे भाजपा पक्षाला मिळालेले सुसंस्कृत,अभ्यासु व संघटन कौशल्य असणारे नेतृत्व आहे.उरूण- इस्लामपुर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन केलेले काम हे संपुर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक होते,या कामातुन त्यांचा अभ्यासुपणा,निर्णयक्षमता,शहरवासियांचे हित व शहराचा विकास दिसुन येत होता.आज पर्यत भाजपा पक्षाने त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.निशिकांतदादांच्या नेतृत्वामुळे सांगली जिल्ह्यातील भाजपा पक्ष अधिक मजबुत होईल,आवश्यक ती सर्व मदत निशिकांतदादांना भविष्यात केली जाईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,पक्षश्रेष्ठींना नुतन जिल्हाध्यक्ष निवडताना फार विचारपुर्वक निवडावे लागले, सर्वसामान्य कुटुंबातुन पुढे आलेले अभ्यासु, कर्तृत्वावर विश्वास असणारे व संघटन कौशल्य असणारे नेतृत्व निशिकांत भोसले- पाटील यांच्या रुपाने सांगली जिल्ह्याला लाभले आहे,उरुण-इस्लामपुर शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन केलेले काम असो,इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील भाजपा पक्षाचे केलेले संघटन असो,भाजपा पक्षाने आज पर्यत दिलेली जबाबदारी असो या सर्व पातळीवर निशिकांतदादांनी आपल्या कामातुन वेगळी ओळख निर्माण केली आहे पक्षाने त्याच्या कामाची व पक्षातील संघटनात्मक कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे,ही जबाबदारी यशस्वी करत दिलेल्या संधीचे सोने निशिकांत भोसले- पाटील नक्की करतील, भाजपा पक्ष आवश्यक ती सर्व मदत करील, भविष्यातील सांगली जिल्हा हा भाजपमय होईल असा विश्वास शेवटी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुरेश खाडे व खा.संजय पाटील म्हणाले निशिकांत भोसले- पाटील यांची निवड म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्तीची झालेली निवड आहे.निशिकांत दादांनी अलिकडच्या काही वर्षात विरोधकांशी टोकाचा संघर्ष केला आहे.इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील भाजपा पक्षाचे संघटन निशिकांतदादांच्या नेतृत्वाखाली मजबुत झाले आहे.अलिकडील निवडणुकीतील मतांची टक्केवारी लक्षात घेता निशिकांतदादांचे संघटनात्मक काम अभिनंदनीय आहे,भाजपा पक्षाने सांगली जिल्ह्याला एक अभ्यासु,सुसंस्कृत,संघटन कौशल्य असणारे नेतृत्व दिल्याने भविष्यात सांगली जिल्ह्यातील संघटनात्मक काम अधिक मजबुत होईल,यापुढील सांगली जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत भाजपा चे कमळ फुलेल.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले -पाटील म्हणाले भाजपा पक्षाने संघटनात्मक केलेल्या कामाची व सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याची दखल घेऊन मला जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घरा घरात भाजपाचा विचार पोहचवुन सांगली जिल्ह्यातील भाजपाचे संघटन अधिक मजबुत करण्याचा प्रयत्न सर्वाना बरोबर घेऊन करणार आहोत.प्रत्येक कार्यकर्त्याला मानसन्मानाबरोबर ताकद देणार असुन संपुर्ण सांगली जिल्हा भाजपमय करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहाणार आहे.यावेळी सांगली जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस मिलिंद कोरे,मिरज विधानसभा मतदार संघाचे प्रमुख मोहन वनखंडे,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.









































































