Last Updated on 03 Dec 2024 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नागपूर । ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाने आद्यप मुख्यमंत्रीच्या नावाची घोषणा केलेली नसली तरी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. नागपूरच्या रामनगर येथील चहाचे दुकान चालवणारे गोपाल बावनकुळे यांना शपथग्रहण समारोहात उपस्थित राहण्यासाठीचे निमंत्रण फोन द्वारे मिळाले आहे. त्यामुळे गोपाळ बावनकुळे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांना निमंत्रण येऊ लागल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गोपाल बावनकुळे देवेंद्र फडणवीसांचे मोठे फॅन:- चहाचा स्टॉल चालवणारे गोपाल बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फॅन म्हणून ओळखले जाते. रामनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून गोपाल चहाचा स्टॉल चालवतात. त्यांनी चहाच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी गोपाळ यांना निमंत्रण मिळाल्यामुळे आता ते मुंबईसाठी निघणार आहेत.
साभार : प्रसार भारती







































































