Last Updated on 26 Jul 2024 7:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कृष्णा-कोयना, वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने तसेच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे मुसळधार प्रमाण व धरणातून विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामूळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल.अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या ‘पूर नियंत्रण कक्षातील ०२३३-२३०१८२०, २३०२९२५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.












































































