Last Updated on 03 Sep 2025 6:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खतनिर्मिती राबविण्यासाठी मंगळवारी घरगुती गणेश विसर्जन दिवशी जिल्ह्यात सुमारे २५ टन निर्माल्य जमा केले.
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यावतीने व पद्मभूषण महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी गौरी व घरगुती गणेश विसर्जन दिवशी निर्माल्य संकलन करण्यात आले.
जिल्ह्यात श्री रामलिंग बेट बहे, आमणापूर नदी घाट, गणेश तलाव मिरज, येरळा नदी तुरची, सांगली नदी घाट, शिराळा, विटा, आळसंद, येलुर, आटपाडी व कवठेमहांकाळ येथे गौरी व घरगुती गणेश विसर्जन करण्यात आले. त्यावेळी प्रतिष्ठानतर्फे नागरिकांनी विसर्जन करताना सर्व निर्माल्य कलशातच द्यावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व गणेश भक्तांनी निर्माल्य कलश यामध्येच जमा केले. यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये सुमारे ११ ठिकाणी सुमारे २५ टन निर्माल्य जमा करण्यासाठी प्रतिष्ठानचे एकूण ३५५ सदस्य एकवटले होते यामध्ये २० ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला
डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम शनिवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी ही घेण्यात येणार आहे.












































































