Last Updated on 04 Sep 2022 5:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा साडे तीनच्या दरम्यान त्यांचा भीषण अपघात झाला.अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पालघर पोलिसांनी सांगितले की,टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात होते. प्रवासादरम्यान त्यांची कार दुभाजकाला धडकली. कारमध्ये 4 जण होते. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले.
या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली.या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे.तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला.चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

कोण होते अब्जाधीश सायरस मिस्त्री
सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध भारतीय वंशाचे अब्जाधीश पल्लोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते. पालोनजी मिस्त्री यांनी एका आयरिश महिलेशी लग्न केले आणि नंतर ते आयर्लंडचे नागरिक झाले.सायरस यांनी 1991 मध्ये कुटुंबाच्या पालोनजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने भारतात अनेक मोठे विक्रम केले.
यामध्ये सर्वात उंच निवासी टॉवर बांधणे, सर्वात लांब रेल्वे पूल बांधणे आणि सर्वात मोठ्या बंदराचे बांधकाम यांचा समावेश आहे. त्याच वेळी, सायरस मिस्त्री यांनी 2006 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळात प्रवेश केला.बांधकामाचे साम्राज्य परदेशात पसरले 90 वर्षीय पालोनजी मिस्त्री यांच्या नियंत्रणाखाली, भारतीय वंशाच्या सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली व्यावसायिकांपैकी एक, एक बांधकाम साम्राज्य आहे जे भारत, पश्चिम आशिया आणि आफ्रिका पसरले आहे. आपल्या मुलांसोबत त्यांनी टाटा सन्समध्ये भाग घेतला.










































































