Last Updated on 25 Sep 2023 3:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । भारतीय अंतराळ यान संशोधन संस्था (इस्त्रो) ने महत्वकांशी चांद्रयान तीन मोहीम यशस्वी करून,चंद्र संशोधनात जगासमोर आपली क्षमता सिद्ध केली.याचा प्रत्येक भारतीयास अभिमान वाटला.विशेष म्हणजे या मोहिमेची छाप यंदाचे घरगुती गणेशोत्सवावर दिसून आली.
इस्लामपूर (जि.सांगली) येथील सौ. विद्या बाबासाहेब हावलदार यांनी आपल्या घरामध्ये गणेश व गौरीची स्थापना चांद्रयान 3 या देखांव्यामध्ये साकारली आहे.सदर देखाव्यात चंद्रयान 3 ची हुबेहूब प्रतिकृती लॅण्डरसह उभारली असून शास्त्रज्ञांच्या रूपात दोन्ही गौरी आपल्या लॅपटॉपवर कंट्रोलरूममध्ये कार्यरत असल्याचा देखावा प्रत्यक्ष पाहताना सजीव भासतो.

तसेच आकर्षक सुंदर गणेश मूर्तीचे पाठीमागे विशिष्ट काळ्या कागदावर विविध ग्रह,ताऱ्यांच्या प्रतिकृती दाखवण्यात आल्या आहेत.ढगांसाठी विशिष्ट कापूस वापरण्यात आलेला आहे,एलईडी लाईटचाही वापर केलेला आहे.अशा देखावाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.एकंदरीतच हा देखावा पाहून सर्वांकडून या प्रामाणिक प्रयत्न बद्दल सौ.विद्या हावलदार व कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ![]()












































































