Last Updated on 07 Apr 2023 11:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्थां15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सन 2022-23 च्या बंधित ग्रँटच्या (टाईड) दुसर्या हप्त्यापोटी रू. 1083.49 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना अनुक्रमे 10-10-80 या प्रमाणात वितरीत करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित ग्रॅटच्या (टाईड) दुसरा हप्ता रू.1092.92 कोटी इतका निधी देण्यात आला होता. केंद्र शासन आणि राज्यशासनाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शन सुचनांनुसार केवळ आयसीआयसीआय बँकेत 15 व्या वित्त आयोगाचे संयुक्त बचत खाते उघडणे अनिवार्य राहील. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत विविध प्रकल्प/योजना मधील कंत्राटदार व इतर लाभार्थी यांना निधीचे वितरण करण्यात येणार आहे.



15 व्या वित्त आयोगांतर्गत निधी – शासन निर्णय PDF मध्ये









































































