Last Updated on 15 Jul 2025 7:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वारणा धरणात 28.54 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली । जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.54 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 76.52 (105.25), धोम 10.34 (13.50), कन्हेर 7.89 (10.10), धोम बलकवडी 2.49 (4.08), उरमोडी 7.42 (9.97), तारळी 4.96 (5.85), वारणा 28.54 (34.40), राधानगरी 7.24 (8.36), दूधगंगा 18.29 (25.40), तुळशी 2.78 (3.47), कासारी 2.05 (2.77), पाटगांव 3.43 (3.72), अलमट्टी 97.55 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 5500, कण्हेर 190, उरमोडी 500, तारळी 940, वारणा 8530, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 800, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 50 हजार 90 व अलमट्टी धरणातून 25 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
पायथा ग्रहातून 2100 व वक्र दरवाज्यातून 3400 क्यूसेक्स एकूण 5500 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13.3 (40) व अंकली पूल हरिपूर 12.8 (45.11).
सांगली जिल्ह्यात सरासरी 15.5 मि.मी. पावसाची नोंद
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 46.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 14 (158.7), जत 1.2 (96.9), खानापूर-विटा 11.6 (118.9), वाळवा-इस्लामपूर 23.2 (276.1), तासगाव 12.6 (144.1), शिराळा 46.2 (693.1), आटपाडी 4.5 (101.6), कवठेमहांकाळ 8.4 (125), पलूस 21.6 (223), कडेगाव 12 (174.1).
कोयना धरण
दि.15/07/2025
वेळ : सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2137’03″(651.434मी)
पाणीसाठा:76.52 टीएमसी(72.70%)
आवक:- 25,478 क्यूसेक्स(2.20 टीएमसी)
पायथा ग्रहातून 2100 व वक्र दरवाज्यातून 3400 क्यूसेक्स एकूण 5500 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे.
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 20/2350
नवजा 33/2235
महाबळेश्वर 100/2318











































































