Last Updated on 05 Aug 2024 10:05 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांडव्यावरून सोडण्यात आलेला विसर्ग कमी करून 40 हजार क्युसेक्स करण्यात येणार
सातारा । सातारा जिल्ह्यात पावसााचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर, कोयना धरण परिसरात पाऊस सुरु आहे.धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 45 हजार 611 क्युसेस अशी सुरू आहे.सोमवारी (5 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 86.34 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 82.03 टक्के भरले आहे.
पश्चिम भागात कास, बामणोली, नवजा, तापोळा, कोयना, महाबळेश्वरला मागील 20 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडू लागला आहे. त्यातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत आहे.
पुणे महसुल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या…
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण भरणार आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास धरणात 86.34 टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर 45 हजार 611 क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून 50 हजार क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून 50 हजार क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. दि. 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेला विसर्ग कमी करून 40 हजार क्युसेक्स करण्यात येणार आहे.तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 42 हजार 100 क्युसेक्स असणार आहे.
सोमवारी (5 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 93 मिलिमीटर, नवजा येथे 74 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 120 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 4 हजार 087 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 747 आणि महाबळेश्वरमध्ये 4 हजार 553 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.05/08/2024, वेळ:सकाळी 08:00 वाजता
पाणीपातळी:2148’03″(654.787मी)
पाणीसाठा:86.34 टीएमसी(82.03 टक्के)
आवक:- 45,611 क्यूसेक्स
कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 50 हजार क्यूसेक्स व पायथा ग्रहातून 2 हजार 100 क्यूसेक्स असा 52 हजार 100 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 93/4121
नवजा 74/4773
महाबळेश्वर 120/4571
Update date : 05 August 2024, 08.21 AM













































































