Last Updated on 13 May 2023 8:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाची संयुक्त कारवाई
कोची । केरळ किनारपट्टीवर एका जहाजातून सुमारे अडीच हजार किलो मेथॅम्फेटामाइन हे अंमली पदार्थ भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं संयुक्त कारवाईत आज जप्त केले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 15 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
समुद्रगुप्त नावानं ही मोहीम राबवण्यात आली. या प्रकरणी एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतलं आहे.पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणचा समावेश असलेल्या डेथ क्रिसेंट प्रदेशातून ही खेप आली असल्याचं मानलं जातं.
एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांनी आज संध्याकाळी कोची येथे माध्यमांना ही माहिती दिली.










































































