Last Updated on 12 Mar 2024 10:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | गट-क संवर्गातील कृषी सेवक या संवर्गातील सरळसेवेनेपदभरतीसाठी आय.बी.पी.एस. कंपनीकडून परिक्षा घेण्यात आली होती. या कंपनीकडून प्राप्तगुणांच्या आधारे अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील गट-क कृषीसेवक संवर्गातील जाहिरात दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी कृषि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
सदर जाहिरातीच्या अनुषंगाने आय.बी.पी.एस. कंपनी मार्फत दि. 16 व 19 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली आहे.
या परीक्षेच्याअनुषंगाने आय.बी.पी.एस. कंपनीकडून प्राप्त गुणांनुसार उमेदवारांची अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी व किमान 45 टक्के गुणांची अहर्ताधारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्तायादी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले आहे.










































































