Last Updated on 04 Dec 2023 8:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कापूसखेड (ता. वाळवा) येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलन कापूसखेड संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिव्यांग बांधवांना जागतिक अपंग दिनाच्या शुभेच्छा देवून साजरा केला.जेष्ठ दिव्यांग सुदाम मोकाशी यांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी कापूसखेड प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सचिव महादेव पाटील,संघटनेचे सदस्य कृष्णात खराडे,सहदेव माळी,प्रल्हाद कुंभार,दिगंबर मोकाशी,माणिक खराडे,प्रशांत गुरव,युवराज पाटील,आदित्य गुरव,आकाश मोकाशी उपस्थित होते
संतोष कुंभार यांनी दिव्यांग बांधवांना दिव्यांग योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे महादेव पाटील यांनी आभार मानले.












































































