Last Updated on 12 May 2023 11:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२४ जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होत आहे.यासाठी राज्यभरात ३४ मतमोजणी केंद्र्ं उभारण्यात आली आहेत.कर्नाटक विधानसभेसाठी परवा झालेल्या मतदानात ७३.१९ टक्के मतदान झाले होते.उद्या सर्वसाधारण मतमोजणी प्रक्रियेनुसार मतमोजणी होईल.मतदान यंत्र आणि मतमोजणी ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होईल.
बेळगावचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत येणार
बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी,१३ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
राज्यातील बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे २६१५ उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे. यात काही एक्झिट पोलनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला धक्का बसण्याची चिन्हे असून काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११३ इतका आहे. त्यामुळे ही मॅजिक फिगर गाठण्यात आता कोणता राजकीय पक्ष यशस्वी होईल हे उद्याच स्पष्ट होईल.
थेट निकाल कुठे पाहायचा?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल Election Commission of India च्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता. निवडणूक मतमोजणीचे लाइव्ह अपडेट्स तुम्हाला यात मिळतील.
यात तुम्ही results.eci.gov.in वर जाऊनही थेट निकाल तपासू शकता.
शिवाय http://www.eciresults.nic.in, eci.gov.in, वेबसाइट्सवरूनही तुम्ही कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता आल्या हे पाहू शकता.
तसेच तुम्ही टिव्ही किंवा बातम्यांचे ऑनलाइन कव्हरेजदेखील फॉलो करू शकता.
ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही ‘लोकसत्ता’चा कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल २०२३ लाइव्ह ब्लॉगदेखील पाहू शकता.








































































