Last Updated on 08 May 2023 9:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर शाहू मिलमध्ये मोफत कॅलीओग्राफी कार्यशाळा
कोल्हापूर । काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली कला म्हणजे सुलेखन.मॉडर्न शब्दात सांगायचे म्हणजे ‘कॅलीओग्राफी’ या कलेच्या जोरावर आपल्या प्राचीन ग्रंथाची हस्तलिखीते आजही मराठी माणसांच्या देवघरात मोठ्या दिमाखात संग्रही आहेत.या कलेला संजिवनी मिळावी तसेच या कलेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात गोडी निर्माण व्हावी.जिज्ञासा जागृत व्हावी या उद्देशाने इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. राजेंद्र हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने शाहू मिलमध्ये मोफत कॅलीओग्राफी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
साधारणता सकाळी साडे अकराच्या सुमारास प्रारंभ झालेल्या या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक दडपण…हुरहुर…जिज्ञासा…कुतुहल आणि महत्वाचे म्हणजे जिद्द..! या सर्वांचे एकत्रित मिश्र भाव झळकत होते. सकाळी साडे अकरा ते दुपारी 2.30 पर्यंत चाललेत्या कार्यशाळेत प्रा. हंकारे यांनी विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषेत मार्गदर्शन केले. ‘सुलेखनाचा’ हा अध्याय आत्मसात करण्यासाठी दोनशेच्या आसपास विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.
‘सुलेखन’ एक कला…आत्मसात करण्यासाठी वयाचे बंधन नाही
‘सुलेखन’ एक कला आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी वयाचे बंधन नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर व्यक्ती ही कला आत्मसात करु शकते. फक्त यासाठी जिद्द आणि सातत्य हवे.या कलेमुळे व्यक्तीला अमूल्य असे मानसिक समाधान लाभते. आत्मिक समाधानासाठी व्यक्तींनी या कलेकडे वळावे
– प्रा. राजेंद्र हंकारे












































































