Last Updated on 12 Jun 2023 11:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
समुहाच्या ५०७ विद्यार्थ्यांनी मिळविले १०० ते ९० पर्सेंटाईल !
कोल्हापूर । महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभागामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२३ परीक्षेचा निकाल नुकताच बेवसाईटवर जाहीर झाला असून या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या कु. सेजल रमेश राठी या विद्यार्थिनीने १०० पर्सेंटाईल गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कोचिंग क्लासेस व आयआयटी-नीट अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एमएचटी-सीईटीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विक्रम केला आहे.
या निकालाविषयी सविस्तर माहिती देताना, चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी सांगितले की, ही परीक्षा विद्यार्थ्याच्या करिअरची दिशा ठरविणारी असल्यामुळे या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या ३७ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळविले तर ९९ ते ९० या दरम्यान पर्सेंटाईल मिळविणार्या चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांची संख्या ५०७ इतकी आहे. चाटे शिक्षण समुहाच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी चाटे समुहाच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, िंसधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांनी चाटे शिक्षण समुहावर दाखविलेला विश्वास आमची जबाबदारी वाढवितो याची आम्हाला जाणीव आहे.
‘एमएचटी-सीईटी’ २०२३ परीक्षेमधील कोल्हापूर विभागातील ९९ पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळविणारे आमचे काही विशेष गुणवंत – सेजल राठी, ऋतुजा शिंदे,ओम इंगुलकर,अमन तांबोळी,आशिष पाटील,विशाखा प्रज्ञासागर,साक्षी पाटील,अनन्या गंभीरराव,करण जाधव,अथर्व साळोखे,विपूल पाटील,आर्णव पाटील,तन्वी पाटील,श्रेया चव्हाण,पारस पाटील,सौरभ डोईफोडे.
या परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे चाटे समुहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांच्यासह कोल्हापूर विभागातील चाटे ज्यु. कॉलेजचे प्राचार्य, शैक्षणिक विभाग प्रमुख, चाटे कोचिंग क्लासेसचे शाखा व्यवस्थापक, समुहाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.











































































