Last Updated on 23 Sep 2024 9:58 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नांदेड । खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी.
ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी. जेणेकरुन सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.









































































