Last Updated on 13 Jan 2024 2:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रामलल्ला प्रतिष्ठापणानिमित्त आ. जयंत पाटील परिवारातील महिलांचा पुढाकार
सांगली । माजी मंत्री आ.जयंत पाटील परिवारातील महिलांनी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ११.२२ वाजता इस्लामपूर येथील लाल चौकातील मंदीरात महाआरती करण्याचा निर्धार केला.भारतीय तिरंग्याच्या तीन रंगातील साड्या परिधान केलेल्या ३ हजार महिला सहभागी होणार आहेत. जय हनुमान पतसंस्थेच्या श्रीमती कुसुमताई पाटील सभागृहात महिला व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला.यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
अयोध्येत राम मंदीर उभारण्यात आले असून सोमवार दि.२२ जानेवारी रोजी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.हे औचित्य साधून लाल चौकातील महादेव मंदीरात श्रीराम-लक्ष्मण,सीता आणि हनुमान मुर्ती समोर ही महाआरती केली जाणार आहे.या महाआरतीच्या नियोजनाच्या बैठकीस माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील,महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रोझा किणीकर, जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,रुपाली जाधव,वैशाली डांगे, सविता डांगे,आशाराणी पाटील,शुभांगी शेळके,जयश्री पाटील,जयश्री माळी,पुष्पलता खरात,प्रियांका साळुंखे,उषा पंडीत-मोरे, मंदाकिनी चव्हाण यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.
अरुणादेवी पाटील म्हणाल्या,आपण महिला सण,उत्सवप्रिय आहोत. राम मंदीर उभारणी व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करूया.
प्रा.शामराव पाटील,शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांनी आपणही राम भक्त आहोत. स्व.राजारामबापू पाटील,आ.जयंत राव पाटील यांनी ३०-३५ वर्षांपूर्वी कारखाना कार्यस्थळावर भव्य राम मंदीर बांधले आहे. महाआरती सोहळा अगदी नियोजनबद्ध करू. सेवा दलाचे शहराध्यक्ष सुनिल मलगुंडे,जेष्ठ कार्यकर्त्या उषा पंडित-मोरे यांच्यासह अनेक महिलांनी सूचना केल्या.
प्रारंभी महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मनिषा पेठकर,योगिता माळी,शैलजा जाधव,संगीता शहा,संजना तेवरे,मालन वाकळे,अलका शहा, सुनंदा साठे,तसेच शंकरराव चव्हाण,सचिन कोळी,स्वरूप मोरे,शकील जमादार,विजय देसाई यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. पुष्पलता खरात यांनी आभार मानले.










































































