Last Updated on 18 Jul 2023 6:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख निशिकांत भोसले-पाटील यांची माहिती
सांगली । इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना महाराष्ट्र राज्याच्या पुरवणी अर्थ संकल्पात 25 कोटी 55 लाख 38 हजार 167 इतका निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती इस्लामपुर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हयाचे उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी दिली.
यावेळी बोलताना निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात केंद्र व राज्य शासनाने अनेक प्रलंंबित विकास कामांना कोटयावधीचा निधी दिला आहे. या मतदार संघामधील सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत विकास कामे मार्गी लावण्याच्या द़ृष्टीने उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील अंतर्गत रस्त्यांना व रस्त्यांनाची सुधारणा कामांना राज्य शासनाने प्रथमच 25 कोटी हून अधिक निधी दिला आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेयाने व मतदारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
निधी मंजूर झालेल्या मध्ये पुसेसावळी वांगी -नागठाणे, वाळवा-बोरगाव-बहे, तांबवे -कासेगाव -टाकवे रा.मा.158 भाग, वांगी ते वाळवा -कि.मी 2/270 ते 70/00 ची सुधारणा करणे. (26 लाख 28 हजार 932) पुसेसावळी वांगी -नागठाणे, वाळवा-बोरगाव-बहे, तांबवे -कासेगाव -टाकवे रा.मा.158 भाग वाळवा ते वाकुर्डे खुर्द कि.मी. 7/00 ते 117/2015 ची सुधारणा करणे (29 लाख 9 हजार 235),भडकंबे ते जुना कोरेगाव रस्ता ग्रा.मा.क्र. 52 वर किमी. 3/750 मध्ये मोठया पुलाचे पोहच रस्त्यास बांधकाम करणे. (पोहचमार्गाचे भ्ाुसंपादन करणे). (1 कोटी 50 लाख), साखराळे रामा.क्र. 150 ते वाळवा तुजारपूर कामेरी ते रामा.क्र. 0/00 ते 24/600 मध्ये सुधारणा करणे. (7 कोटी 50 लाख), बोरगाव गोटखिंडी रस्ता प्रजिमा. क्र. 161 किमी. 0/00 ते 16/600 मध्ये सुधारणा करणे. (7 कोटी 50 लाख), मिरज तालुक्यातील आष्टा दुधगाव कुंभोज रस्ता प्रजिमा. क्र. 17 किमी 4/00 ते 6/500 सुधारणा करणे. भाग-तालुका हद्द ते दुधगाव (2 कोटी 50 लाख), मिरज तालुक्यातील खोची दुधगाव कसबे डिग्रज मौजे डिग्रज ते कर्नाळ रस्ता प्रजिमा क्र. 126 किमी. 12/900 ते 14/200 महापूरामध्ये बुडणार्या रस्त्याची उंची वाढवणे. भाग-राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 ते कसबे डिग्रज (2 कोटी 50 लाख), मिरज तालुक्यातील सावळवाडी शेरे कवठे समडोळी सांगलीवाडी रस्ता प्रजिमा. क्र. 127 ची सुधारणा करणे किमी0/000 ते 3/000 भाग सावळवाडी ते शेरे कवठे (3 कोटी 50 लाख), आदि विकास कामांना सदरचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे या निधी मंजूरीसाठी विशेष सहकार्य लाभले असल्याचे निशिकांत भोसले -पाटील यांनी सांगितले.









































































