Last Updated on 03 Aug 2024 6:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील महाराष्ट्र अकॅडमी इस्लामपूरच्या चार विद्यार्थिनींची जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक व मोजणीदार पदी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती – 2023 मध्ये जलसंपदा विभागातील विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा झाली होती.
यातील जलसंपदा विभाग सातारा मध्ये कालवा निरीक्षकपदी स्वाती देवाप्पा पुजारी व मोजणीदारपदी रेश्मा संभाजी नांगरे यांची निवड झाली आहे. जलसंपदा विभाग पुणे- मोजणीदारपदी राणी दत्तात्रय इरळे-माळी तर जलसंपदा विभाग औरंगाबाद कालवा निरीक्षकपदी आरजू कादर आत्तार यांची निवड झाली आहे.
या सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये मराठी,इंग्रजी,गणित-बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान इत्यादी विषयांचा समावेश होता.महाराष्ट्र अकॅडमी इस्लामपूरचे अनुभवी विषयतज्ञ प्रा सुभाष खोत,प्रा.समीर साताळकर,प्रा उमाकांत वाघमारे,प्रा.प्रकाश कुंभार,प्रा.बालाजी गावंडे यांचे यशस्वी विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र अकॅडमी चे संस्थापक सचिव अस्लम शिकलगार यांनी सराव चाचण्यांचे आयोजन केले.महाराष्ट्र अकॅडमी,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम अनुभवी विषय तज्ञांच्या माध्यमातून पूर्ण करत असते व मोठ्या प्रमाणात सराव चाचण्याचे आयोजन करते त्यामुळेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्र अकॅडमीचे अनेक विद्यार्थी यशस्वी होत आहेत. ग्रामीण भागातील होतकरू गरजू विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अकॅडमी इस्लामपूर एक आशाचे स्थान बनले आहे. दोन वर्षाच्या पॅटर्नमध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्र अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळत आहे. हाच शासकीय नोकरीची हमी देणारा महाराष्ट्र अकॅडमी चा यशस्वी पॅटर्न आहे.
यशस्वी विद्यार्थिनींचे महाराष्ट्र अकॅडमीचे अध्यक्ष बशीर सुतार शिकलगार यांनी अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.












































































