Last Updated on 27 Dec 2024 7:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उपाध्यक्षपदी राजेंद्र माळी तर सचिवपदी विजय लाड यांची निवड
सांगली । राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुप च्या अध्यक्षपदी प्रा.कृष्णा मंडले (कासेगाव), कार्याध्यक्षपदी भूषण शहा (इस्लामपूर), उपाध्यक्षपदी राजेंद्र माळी (इस्लामपूर),तर सचिवपदी विजय लाड (राजारामनगर) यांची निवड करण्यात आली आहे.

माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेल्या २३ वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने राज्य व देशातील ७५ हून अधिक दिग्गज कलाकारां च्या संगीत रजनी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे.
नूतन पदाधिकारी-सहसचिव-विजय नायकल (नायकलवाडी), खजिनदार – विश्वास कदम (मसुचीवाडी). कार्यकारी समिती-नजीर शेख (माजी कार्याध्यक्ष), सुनिल चव्हाण (मावळते अध्यक्ष), प्रा.प्रदीप पाटील (मावळते कार्याध्यक्ष), सतिश पाटील (माजी अध्यक्ष), विश्वनाथ पाटसुते (मावळते सचिव), लव्हाजी देसाई (इस्लामपूर), विनायक यादव (बनेवाडी).
आविष्कार कल्चरल ग्रुपचे मार्गदर्शक मोहनराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पुढील ३ वर्षासाठी या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी सचिनकाका पाटील, माजी संचालक डी.बी.पाटील, माजी सरपंच बाबुराव पाटील, सुजित पाटील (बहे), संजय पाटील (तांबवे), बाळासाहेब पाटील (नवेखेड), अनिल पाटील (आष्टा) यांच्यासह कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.









































































