Last Updated on 04 Sep 2023 6:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी मंत्री आ.जयंत पाटील यांची इस्लामपूर पोलीस स्टेशनला भेट
सांगली । माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर पोलीस स्टेशनला भेट देत प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी राहुल चव्हाण यांनी गेल्या अडीच-तीन महिन्यात केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले.यावेळी त्यांनी त्यांच्या बदली बद्दल त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी राहुल चव्हाण हे गेल्या अडीच-तीन महिन्यापासून इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत.त्यांनी आपल्या या कालावधीमध्ये इस्लामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था योग्य रीतीने हाताळत गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविला आहे. त्यांचा नुकताच कालावधी संपल्याने त्यांची बदली झाली आहे. त्याबद्दल आ.पाटील यांनी त्यांच्या चांगल्या कामाचे अभिनंदन करून त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य चिटणीस,माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी सभापती खंडेराव जाधव,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, सुभाषराव सुर्यवंशी,माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे,युवा नेते संदीप पाटील,परेश पाटील यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.














































































