Last Updated on 22 Jan 2022 7:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अमरावतीतील चिखलदऱ्यात स्कायवॉकला केंद्र सरकारची परवानगी
मुंबई ।
जगातील सर्वात मोठा स्कायवॉक विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती इथल्या चिखलदरा इथं होणार होणार आहे. हा प्रस्तावित स्कायवॉक जवळपास 407 मीटर म्हणजेच जगातील सर्वात लांब असणार आहे. राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर अखेर केंद्र सरकारकडून या स्कायवॉकच्या बांधकामाला पर्वांग्गी देण्यात आली आहे.
जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे.स्वीझरलँडचा स्कायवॉक ३९७ मीटर लांबीचा आहे.चीनचा स्कायवॉक ३६० मीटर लांबीचा आहेमात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे.

चिखलदऱ्यात होणारा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. त्यामुळे चिखलदरामध्ये राज्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी वाढेल, असा अंदाज आहे. मेळघाटच्या चिखलदऱ्यातील गोराघाट पॉईंट पासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉक 407 मीटरचा हा प्रकल्प 2018 मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी 34.34 कोटी रुपये खर्च होणार आहे.
जिल्ह्यातील चिखलदरा क्षेत्रातील टायगर ब्लॉक प्रोजेक्टअंतर्गत बफर झोनमधील महाराष्ट्राच्या सिडको विभागाद्वारे ग्लास स्कायवॉकचे काम सुरू आहे. या स्कायवॉक निर्मितीला गती यावी यासाठी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार केंद्र शासनाकडून परवानगी मिळून स्काय वॉक निर्मितीतील अडथळा दूर झाला आहे.
जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्काय वॉक चिखलदरा येथे व्हावा यासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. स्कायवॉकसाठी केंद्र व राज्य शासनासोबत व संबंधित विभागासोबत पत्रव्यवहार करून स्कायवॉकला परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले.
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनीही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीतील बैठकीत याविषयी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठपुराव्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी शासनाकडून केंद्र शासनाकडे तत्काळ पाठपुरावा होऊन परवानगी प्राप्त झाली आहे. स्काय वॉक विकासाला गती मिळणार आहे.











































































