Last Updated on 07 Sep 2025 6:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ‘अधोरेखित’ हे न्यूज पोर्टल नेहमीच वाचकांसमोर नवनवीन, वेगळे आणि विचार करायला लावणारे सदर घेऊन येत असते. त्याच परंपरेत आता आणखी एक धारदार आणि ठसकेबाज सदर सुरू होणार आहे. या नव्या सदराचे नाव आहे ‘शालजोडे’.
‘शालजोडे’ हा शब्द ऐकताना थोडं गंमतीशीर वाटतं; पण यात एक मार्मिक अंग दडलेलं आहे. कुणी चुकीचं वागत असेल, नियम मोडत असेल, बेफिकीरपणे वागत असेल तर त्याला मिळणारा हलकासा पण टोचणारा धक्का म्हणजे शालजोडा! समाजातील विविध क्षेत्रातील गडबडी, विसंगती, ढोंगीपणा, फसवेपणा यावर ‘शालजोडे’ सदरातून भाष्य करण्यात येणार आहे.
या सदरात कोणत्याही व्यक्तीवर व्यक्तिगत टीका न करता त्यांच्या कृतींवर, घडामोडींवर, विसंगतींवर उपरोधिक शैलीत भाष्य होईल. वाचकांना हलकंफुलकं वाटतं-हसवतं असतानाच विचार करायला लावणारं लिखाण या सदरातून अनुभवायला मिळणार आहे.
‘अधोरेखित’ने आधीच ‘काय सांगता’, ‘मार्मिक भाष्य’, ‘समाधानाचं घर’, ‘@ Third Eye’ यांसारखी सदरे सुरु केली आहेत. आता ‘शालजोडे’ या नावाने अजून एक नवीन झटका देणारं सदर लवकरच आपल्या समोर येणार आहे.












































































