Last Updated on 17 Jan 2026 6:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करण्याकरिता गैरसोय होऊ नये याकरिता दि. १७ जानेवारी (शनिवार) व दि.१८ जानेवारी (रविवार) या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही केवळ निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी परिपूर्ण अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आलेले आहे. ही माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त नागनाथ चौगुले यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
अर्जदार / उमेदवार यांनी विहित नमुन्यातील ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज https://ccvis.barti.in संकेतस्थळावर भरुन निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचे शिफारस पत्र, १५ अ फार्मवर निवडणूक निर्णय प्राधिकारी यांचा सही, शिक्का, जाती विषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत व ऑनलाईन अर्ज कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावा. अर्जदार यांनी अर्ज सादर करतेवेळी मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे.










































































