Last Updated on 13 Jan 2026 3:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा ही आज होणार आहे. बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज केली जाईल. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये या निवडणुकीची घोषणा होईल.
राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. पुणे, सांगली, सातारा, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणुकींचे बिगुल वाजणार आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच १२ जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू होणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या, असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला होता. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत वेळ दिली होती. मात्र, राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांमध्ये आरक्षण आहे. तर इतर २० जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे त्याविषयी काय निर्णय होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान यावर काल (१२ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी कोर्टाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिली. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाला मुदतवाढ दिली.
त्यानंतर, आज लगेचच राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद होत आहे. लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे.











































































