Last Updated on 25 Oct 2022 2:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । लोकप्रिय सोशल मीडिया अॅप व्हॉट्सअप अनेक भागात डाऊन झाल्याचे समोर आले आहे.व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या समस्येबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. जगभरात व्हॉट्सअॅपचे 2 अब्जांहून अधिक वापरकर्ते आहेत.
दुपारी 12.27 वाजल्यापासून WhatsApp डाऊन असल्याने लाखो युजर्सला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन दिवाळी सणात व्हॉटअप डाऊन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय येत आहे.
दरम्यान, मेटाच्या प्रवक्त्यानं व्हॉट्सअपची सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी काम केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हॉट्सअप डाऊन झाल्याने ट्वीटरवर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
आता युझर्सकडून ‘या’ अॅपला पसंती
WhatsApp बंद झाल्यानंतर अनेक युझर्सला आता मेसेज कसे पाठवावे अशी चिंता होती. मात्र अनेक युझर्स आता मेसेज पाठवण्यासाठी टेलीग्रामचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
गतवर्षी 4 ऑक्टोबर रोजी 6 तास बंद होती सेवा
फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्म गतवर्षी 4 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरात जवळपास 6 तासांसाठी ठप्प झाले होते. यामुळे अब्जावधी वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता.
जगभरात फेसबुकचे 2.85 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. तर व्हॉट्सअॅपचे 2 अब्ज, तर इंस्टाग्रामचे 1.38 अब्ज युजर्स आहेत.












































































