Last Updated on 02 Jan 2026 7:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पुन्हा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून येत्या 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच 30 डिसेंबर पासून चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले
राज्य शासनाच्या निर्णयानुसार गेल्या काही वर्षांपासून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. परंतु, दरवर्षी या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत चालली होती. त्याचप्रमाणे अनेक शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार 2026 मध्ये इयत्ता चौथी व सातवी तसेच इयत्ता पाचवी व आठवी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे.














































































