Last Updated on 14 Oct 2021 7:32 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सध्या भारतातील अनेक IT कंपन्या इंजिनिअरिंग आणि इतर पदवीधर फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी देत आहेत.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच,TCS ने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 43 हजार फ्रेशर्सना काम करण्याची संधी दिली आहे. आता पुढील सहामाहीत 35 हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे
- TCS मध्ये अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी Maths, Statistics, Physics, Chemistry, Electronics, Biochemistry, Computer Science, IT या मध्ये BCA, B.Sc पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवार हे 2020, 2021 आणि 2022 या बॅचेसमधून पास आउट झाले असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संपूर्ण शिक्षणात 5 किंवा 50% पेक्षा जास्त CGPA असणं आवश्यक आहे.
- 2022 मध्ये पास ऊत होणाऱ्या उमेदवारांना एक बॅकलॉग माफ असणार आहे. मात्र त्या आधीच्या बॅचमधील उमेदवारांचा बॅकलॉग नसावा.
- उमेदवारांची संपूर्ण शिक्षणादरम्यानची गॅप ही दोन वर्षांपेक्षा अधिक नसावी.
Important Dates For TCS Bharti 2021
- यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2021
- परीक्षेची तारीख 19 नोव्हेंबर 2021
Selection Process For TCS Recruitment 2021
- TCS मधील या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला परीक्षा घेऊन आणि त्यानंतर मुलखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
- या परीक्षेत Verbal Ability वर 24 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 30 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
- यानंतर Reasoning Ability वर 30 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 50 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
- यानंतर Numerical Ability वर 26 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 40 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
- अशाप्रकारे एकूण 80 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्यासाठी 120 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
अधिक माहिती – https://on.tcs.com/3DpVB0e










































































