Last Updated on 21 Oct 2022 10:24 AM by Sanjay Patil/Adhorekhit
अश्विन कृष्ण 30,मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022
सांगली जिल्हा येथील ग्रहणस्थिती
स्पर्श दुपारी – 04.57
मध्य- 05.वा.51 मिनिट
मोक्ष सायं- 06.30
सूर्यास्त- 06वा.03मिनिट
ग्रहण पर्वकाळ -01 तास 19 मिनिट.
ग्रहण दिसणारे प्रदेश
भारतासह आशिया खंडाचा मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेश, संपूर्ण युरोप खंड,आफ्रिका खंडाचा पूर्वोत्तर प्रदेश या प्रदेशात ग्रहण दिसेल.
पुण्यकाल
हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल ,त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही.म्हणून आपल्या गावाच्या स्पर्श कालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा.
ग्रहणाचा वेध
हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे 03वा. 30 मि. पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध,बाल, वृद्ध,अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी 12:30 पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत.वेदांमध्ये भोजन करू नये.स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इ .करता येईल,तसेच पाणी पिणे’झोपणे’मलमुत्रोत्सर्ग करता येईल.ग्रहण पर्व काळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (सांगली जिल्ह्याकरिता दु . 04.57 ते सायं 06.03 ) पर्यंत पाणी पिणे,मलमूत्रसर्ग ही कर्मे करू नयेत.
ग्रहणातील कृत्ये
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे.पर्व काळामध्ये देवपूजा दर्पण श्राद्ध,जप,होम,दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे .ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे.अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान,दान करण्यापूर्वी शुद्धी असते.
ग्रहणाचे राशिपरत्वे फल
वृषभ,सिंह,धनु,मकर या राशींना शुभ फल.
मेष,मिथुन,कन्या,कुंभ या राशींना मिश्र फल
कर्क,तुला,वृश्चिक आणि मीन या राशींना अनिष्ट फल
ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतीने हे ग्रहण पाहू नये.
मंत्र तंत्र पुरश्चरणा संबंधी
नवीन मंत्र घेण्यास व गृहीत मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे .पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरणकरण्यास ग्रहण पर्वकालामध्ये केल्याने मंत्रसिद्धी होते.
स्नानाविषयी
ग्रहणात सर्व उदक गंगे समान आहे तरीही गरम पाण्यापेक्षा थंड पाणी पुण्यकारक.पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी सरोवर नदी महानदी गंगा समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे.सूर्यग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे . नर्मदा स्नान शक्य नसल्यास स्नानाचे वेळी नर्मदेचे स्मरण करावे.
मोक्ष स्नान आणि भोजनाविषयी
या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नाही.तथापि भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्वात उशिराच्या मोक्ष वेळेनंतर म्हणजे सायं .06. वा .32 मि.नंतर मोक्ष स्नान करावे आणि दुसरे दिवशी सकाळी सूर्य बिंब पाहून नंतर भोजन करावे.
टीप -थोडक्यात सांगायचे झाल्यास मंगळवारी दुपारी 12:30 ते सा.06 :32 पर्यंत बाल ,वृद्ध ,अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतीने ग्रहणाचे वेध पाळावे.
स्पर्श आणि मोक्ष वेळ काही गावे
पुणे स्पर्श -16.51- मोक्ष-18.31
मुंबई -16.49 – 06.08
पंढरपूर -16.55 -18.30
सातारा – 16.54 -18.31 सोलापूर -16.56-18.30
सांगली -16.57 -18.30
कोल्हापूर-16.57_18.30
दिल्ली -16.29 -18.26
बेळगाव -16 .00 -18.30
पंचांग आधार – दाते पंचांग सोलापूर











































































