Last Updated on 19 Sep 2022 12:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (कर्मचारी निवड आयोग) वतीने जवळपास 20 हजार पदांची भरती प्रक्रिया 17 सप्टेंबर 2022 पासून झाली आहे. या भरतीची अधिकृत PDF जाहिरात उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्रातील लाखो पदवीधर उमेदवारांना हि एक नोकरीची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित गट ब आणि गट क पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे.
SSC CGL 2022 अधिसूचना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच ssc.nic.in वर प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी SSC वेगवेगळ्या पात्रता निकषांवर आधारित विविध परीक्षा घेते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2022 आहे.उमेदवारांना सूचित करण्यात येते की संयुक्त पदवी स्तर परीक्षा, 2022 ची सूचना जी तात्पुरती 10 सप्टेंबर 2022 रोजी प्रकाशित होणार होती, ती आता 17 सप्टेंबर.2022 रोजी प्रकाशित करण्यासाठी पुन्हा शेड्यूल करण्यात आली आहे.
| भरतीचे नाव | कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती २०२२ |
| पोस्ट | केंद्र सरकारच्या अंतर्गत गट ब आणि क अधिकारी विविध पदांच्या भरती (सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, प्राप्तिकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक (सीबीआय), निरीक्षक (पोस्ट विभाग आणि केंद्रीय अंमली पदार्थ विभाग) , सहायक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, वरिष्ठ सचिवीय सहाय्यक, कर सहाय्यक या पदांची भरती ) |
- पद संख्या – 20000
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
अधिक माहितीसाठी PDF मधील जाहिरात पहा : येथे क्लिक करा









































































