Last Updated on 03 Feb 2026 9:13 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नांदेड ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता 10 वी साठी 02382-251633 व इ. 12 वीसाठी 02382-251733 या हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहेत.
सदर हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
चवरे ए.पी. (वरिष्ठ अधिक्षक तथा (प्र.) सहाय्यक सचिव ) मो.नं. 9421765683.
उच्च माध्यमिक इ. 12 वी साठी
कारसेकर जे.एस. (सहाय्यक अधिक्षक तथा (प्र.) व.अ.) – मो.नं. 9822823780. पवार एन.पी (पर्यवेक्षक लिपीक) – मो.नं. 9834464177. राठोड ए.सी. (वरिष्ठ लिपीक)- मो.नं. 9545242726.
माध्यमिक इ.10 वी साठी
केंद्रे एम.व्ही. (सहाय्यक अधिक्षक तथा (प्र.) व.अ.)- मो.नं. 9421258116. वैद्य एन.एल. (पर्यवेक्षक लिपीक)- मो.नं. 7972563817. सुर्यवंशी ए.एल. (कनिष्ठ लिपीक )- मो.नं. 7620166354 हे नंबर दिले आहेत.
विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी वरील तसेच पुढील समुपदेशकांशी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर सकाळी 8 ते सायं. 8 यावेळेत संपर्क साधावा.
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु-मार्च 2026 भयमुक्त, तणावमुक्त परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना व इतर घटकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवता याव्यात यासाठी विद्यार्थी-पालक यांचेसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.












































































