Last Updated on 06 Feb 2026 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर मतदान कर्तव्य बजावणी करण्याकरीता मतदान पथकांची नियुक्ती केलेली असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेमधील अधिकारी/ कर्मचारी (मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी) यांची नियुक्ती केली आहे. दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु होणार असल्यामुळे तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांच्याकडील दिनांक 30 जानेवारी 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सुट्टी जाहीर केलेली असल्यामुळे निवडणूक मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवार, दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सुट्टी जाहीर केली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.














































































