Last Updated on 27 Aug 2024 6:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
धरण 95.38 टक्के भरले, धरणात पाण्याची आवक 41 हजार 265 क्यूसेक्स इतकी
सातारा । आज सायंकाळी 4 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 3 इंच उघडून सांडव्यावरून 10 हजार 355 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात करण्यात आला आहे.धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 12 हजार 455 क्युसेक्स आहे. येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 100.38 टीएमसी झाला आहे. धरण 95.38 टक्के भरले आहे. धरणात पाण्याची आवक वाढली असून ही आवक 41 हजार 265 क्यूसेक्स इतकी आहे.
गेल्या काही दिवसात पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पूर्ण उघडीप दिली होती. मात्र, गेल्या चार -पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस पडू लागला आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत नव्हते; परंतु शुक्रवारपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे.पश्चिम घाटक्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाले आणि कोयना पाणलोटातील वार्षिक सरासरीच्या समीप रेंगाळलेल्या पावसाचे प्रमाण चालू हंगामाचा बराच कालावधी शिल्लक असताना, रविवारी वार्षिक सरासरी मागे टाकणारा ठरले. पश्चिम घाटक्षेत्रात पुन्हा कोसळू लागलेल्या पावसाचा जोर कोयना पाणलोटात वाढू लागला आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली.तर जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात अधिक चांगले पर्जन्यमान झाले.
मंगळवारी (27 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 36 मिलिमीटर, नवजा येथे 55 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 75 मिलिमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 4 हजार 806 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 5 हजार 685 आणि महाबळेश्वरमध्ये 5 हजार 482 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.27/08/2024
वेळ:-सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2159’09″(658.292मी)
पाणीसाठा:100.38 टीएमसी(95.38%)
आवक:- 41,265 क्यूसेक्स
पायथा ग्रहातून 2100 व वक्र दरवाजातून 10,355 क्यूसेक्स असा एकूण 12,455 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 36/4806
नवजा 55/5685
महाबळेश्वर 75/5482
पूर नियंत्रण कक्ष
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–27/08/2024 5:00 PM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/ 15’11”
2) बहे पूल-(23.7)9’3″
3) ताकारी पूल (46)/27’3″
4)भिलवडी पूल -(53)27’8″
5)आयर्विन- (45)/23’07”
6)राजापूर बंधारा-(58)/36’10”
7) राजाराम बंधारा-(43)/34’6″
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 27542
2) आयर्विन पूल – 39853
3) राजापूर बंधारा – 79833
4) राजाराम बंधारा – 35417
5) कोयनाधरण- 100.38TMC/12455
6)वारणा धरण- 33.48 TMC/ 2435
7)अलमट्टी धरण-120.417
आवक – 98781
जावक-150000












































































