Last Updated on 28 Aug 2024 10:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सुधारित वृत्त
सातारा । जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत कोयनेला 38, नवजा येथे 44 आणि महाबळेश्वरला 42 मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात 100 टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारी 97.53 झाली असून 105.25 पाण्याची क्षमता असलेले धरण भरण्याकडे वाटचाल करु लागले आहे.
पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता सांडव्यावरील विसर्ग वाढवून 30 हजार क्युसेक्स करण्यात येणार आहे. येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 32 हजार 100 क्युसेक्स असणार आहे.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. तर जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात अधिक चांगले पर्जन्यमान झाले.
बुधवारी (28ऑगस्ट) सायंकाळी पाच पर्यंत कोयना धरणात आता 102.65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणामध्ये साधारण 38 मिलिमीटर, नवजा येथे 44 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 148 मिलिमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 4 हजार 884 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 5 हजार 778 आणि महाबळेश्वरमध्ये 5 हजार 597 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.28/08/2024
वेळ:-सायकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2161’06″(658.825मी)
पाणीसाठा:102.65 टीएमसी(97.53%)
आवक:- 40,217क्यूसेक्स
पायथा ग्रहातून 2100 व वक्र दरवाजातून 17,603 क्यूसेक्स असा एकूण 19,703 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 38/4884
नवजा 44/5778
महाबळेश्वर 42/5597









































































